
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. यावेळी पश्चिम बंगालमधील एका प्रचारसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.
राहुल गांधी हे सोमवारी प्रचारासाठी म्हणून थुथुकुडी येथील सभेला उपस्थित होते. या प्रचार सभेवेळी त्यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणमध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करण्यासाठी इस्रायलचा दौरा केला होता. तसेच भाजपवर निशाणा साधताना राहुल गांधींनी विधान केले की, ‘जर ट्रम्प यांनी सांगितले, तर पंतप्रधान मोदी उडी मारायलाही तयार होतील.’
पुढे बोलताना त्यांनी असा दावा केला की, इराणमधील युद्धापूर्वी मोदींना अचानक इस्रायलला जाण्यास सांगण्यात आले आणि त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन भेट दिली व ते परतले. मोदींनी असे का केले असावे यामागील कारण सांगताना त्यांनी पुन्हा एकदा ‘एपस्टीन फाईल्स आणि अदानी’ यांचा उल्लेख केल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी संसदेत आत्मविश्वासाने उभे राहू शकले नाहीत, राहुल गांधी यांची टीका

























































