
Bharti Airtel ने आपल्या 84 दिवसांच्या वैधतेच्या प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ केली आहे. 1.5GB प्रतिदिन डेटा देणाऱ्या प्लॅनची किंमत 859 रुपयांवरून वाढवून 899 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे या किमतीच्या श्रेणीत आता 899 रुपयांचा प्लॅन एअरटेलचा प्रमुख दीर्घकालीन पर्याय ठरला आहे.
यापूर्वी 700 ते 800 रुपयांच्या श्रेणीत एअरटेलकडे 799 आणि 859 रुपयांचे दोन प्लॅन उपलब्ध होते. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB किंवा 2GB डेटा आणि 77 ते 84 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र 859 रुपयांचा प्लॅन वाढवून 899 केल्याने आता या सेगमेंटमध्ये बदल झाला आहे.
प्लॅनमध्ये काय मिळते?
- सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग (लोकल, STD आणि रोमिंग)
- दररोज 100 SMS
दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा (84 दिवसांसाठी) - दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो.
- अतिरिक्त फायदे (Rewards)
- 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium
- इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी स्पॅम अलर्ट
- फ्री हेलोट्यून्स (दर 30 दिवसांनी एकदा बदलण्याची सुविधा)
मात्र, याआधी 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारी ‘RewardsMini’ सबस्क्रिप्शन (कॅशबॅक फायदे) आता काढून टाकल्याचे दिसत आहे. याबाबत एअरटेलकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
























































