
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेता पुष्कर जोगचा स्टायलिश आणि डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला.

जागतिक सिनेसृष्टीच्या प्रतिष्ठित मंचावर मराठी पाऊल पुढे पडताना दिसले आणि अभिनेता पुष्कर जोगची दमदार एन्ट्रीची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

व्हाईट शर्ट, ब्लॅक सूट, ब्लॅक बो आणि ब्लॅक गॉगलमध्ये पुष्कर जोगचा कान्सच्या रेड कार्पेटवर ‘जेंटलमन’ लूक सध्या व्हायरल झाला आहे.

माझा देश भारत आणि माझं राज्य महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणं ही अभिमानाची भावना होती. जय महाराष्ट्र! असे म्हणत पुष्करने कान्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल सारख्या प्रतिष्ठित मंचावर मराठी अभिनेत्याने एन्ट्री करणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.































































