
सध्या कान्स चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या कलाकारांचे लूक चांगलेच चर्चेत आहेत. यात सध्या लक्ष वेधून घेतले आहे ते अभिनेत्री डायना पेंटी हिचा सोबर लूकने.

डायनाने कान्ससाठी मनीष मल्होत्रा याने डिझाईन केलेली गोल्डन रंगाची साडी नेसली होती. या साडीला वेस्टर्न लूक देण्यासाठी त्याच रंगाचे आणि फॅब्रिकचे जॅकेटही तिने घातले होते.

तिने हा लूक फारच मिनिमल ठेवला होता. हातात सोनेरी रंगाचे घड्याळ,सोनेरी रंगाचे कानातले आणि सोनेरी रंगाचा बेल्ट घालून तिने खूपच सोबर लूक ठेवला होता. मात्र या सोबर लूकने देखील ती फारच सुंदर दिसत होती.































































