
हिमाचल प्रदेशमधील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या कसौली जवळील जंगलाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती.

बुधवार दुपारपर्यंत ही आग सीआरआय, दूरदर्शन व आकाशवाणी केंद्र आणि कसौली क्लब जवळ पोहोचली होती.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने हवाई दलाला पाचारण करण्यात आले होते.

हवाई दलाने दोन हेलिकॉप्टरद्वारे पाण्याचा मारा करून तब्बल 15 तासानंतर आग नियंत्रणात आली, अशी माहिती पीटीआयने दिली.

चंदिगडच्या सुखना सरोवरातून पाणी आणून ही आग विझवण्यात आली.
हिमाचल प्रदेशमधील जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाण्याचा मारा pic.twitter.com/JwuuLhLV9B
— Saamana Online (@SaamanaOnline) May 27, 2026





























































