
शेअर्स किती काळ ठेवावे, हे तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर आणि धोरणावर अवलंबून असते. गुंतवणूक वाढावी म्हणून शेअर्स कमीत कमी 3 ते 5 वर्षे ठेवणे फायदेशीर ठरते.
तुमचा कंपनीच्या व्यवसायावर पूर्ण विश्वास असेल तर शेअर्स 5 ते 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठेवणे उत्तम. यामुळे बाजारातील चढ-उतार पचवता येतात.
स्विंग ट्रेडिंग/मोमेंटम ट्रेडिंग या प्रकारात शेअर्स काही दिवस, आठवडे किंवा महिने ठेवून नफा मिळवला जातो आणि मग त्यातून बाहेर पडले जाते.
इंट्राडे ट्रेडिंग यात शेअर्स एकाच दिवसात (मार्पेट बंद होण्यापूर्वी) विकत घेऊन विकावे लागतात. टॅक्सच्या दृष्टीने, होल्डिंग कालावधी खूप महत्त्वाचा असतो.
कंपनीत घोटाळा झाल्यास किंवा सतत तोटा झाल्यास शेअर विकणे योग्य ठरते. ठरवलेला नफा (उदा. 20 ते 25 टक्के) मिळाल्यास काही शेअर्स विकू शकता.




























































