हे करून पहा – मोदक 24 तास मऊ राहतील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संकष्ट चतुर्थीला गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली जाते. मात्र अनेकदा उकड फाटते किंवा काही वेळातच कडक होतात.

जर मोदक 24 तास मऊ राहावेत, उकड छान लवचिक व्हावी आणि मोदक सुंदर आकारात तयार व्हावेत असे वाटत असेल तर उकडीत साबुदाण्याचे पीठ मिसळा.

साबुदाणा पिठामुळे उकड मऊ, लवचिक आणि स्मूद होते. त्यामुळे मोदक वळताना उकड फाटत नाही आणि पाकळय़ा सुंदर तयार होतात आणि मोदक परफेक्ट आणि मऊसूत होतात.