इराणमध्ये सत्तापालटाची भीती, मोजतबा खामेनी यांनी नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी देशातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अमेरिका आणि इस्रायलसारखे शत्रू देश इराणच्या ताकदीसमोर हरले असून, आता ते इराणमध्ये आपापसात भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोजतबा यांनी म्हटले आहे. लोकांमध्ये निराशा पसरवणारी कोणतीही कृती ही थेट शत्रूला मदत करण्यासारखीच असल्याचे ते म्हणाले आहे. अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणमध्ये अंतर्गत बंड घडवून आणू शकतात, अशी भीती सध्या इराणला सतावत आहे. मोजतबा खामेनी यांनी एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे.