
राजस्थानच्या जयपूरमध्ये फटाके बनवण्याच्या कारखान्यात भीषण आगीची घटना मंगळवारी घडली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. शहरातील खो नागोरियान परिसरात ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, एका घरामध्ये अनधिकृत फटाके बनवण्याचा कारखाना सुरू होता. अचानक या कारखान्यात आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तपास सुरू आहे.

























































