
अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने 2-0 ने आघाडी घेत यापूर्वीच मालिका आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे शनिवारी चेन्नईत होणाऱया मालिकेतील अखेरच्या औपचारिक सामन्यात हिंदुस्थानच्या संघात नव्या चेहऱयांना संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ उद्याच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
या सामन्यात अर्शदीप सिंग खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या जागी अष्टपैलू नितीश रेड्डी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात बदल होणार हे निश्चित आहे.



























































