
निरोगी आयुष्यासाठी शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. यासाठी दररोज व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. व्यायामात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी अनेक जण काळजी घेतात. ते कधीही व्यायामाशी तडजोड करत नाहीत. व्यायामामध्ये सातत्य राखणे हीच तंदुरुस्तीची गुरुकिल्ली आहे, असेच धडे ही महिला आपल्या या छोट्या बाळाला देत असावी. मैदानात व्यायाम करण्यासाठी आलेल्या महिलेने बाळाला पोटाशी धरून व्यायाम केला. बाबा कसे व्यायाम करतात हेही हा चिमुकला पाहतोय.



























































