
इजिप्त आणि इराण यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला. या बरोबरीनंतरही इजिप्तने आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले आणि बाद फेरीसाठी पात्र ठरला. या गटात इराण तिसऱ्या स्थानावर आहे, परंतु त्याचा प्रवास अजून संपलेला नाही. तिसऱ्या स्थानावरील अव्वल आठ संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकतात, ज्यात इराण सहाव्या स्थानावर आहे. या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. महमूद साबेरने पाचव्या मिनिटाला इजिप्तला आघाडी मिळवून दिली, पण इराणने बरोबरी साधायला फार वेळ लावला नाही.
१४व्या मिनिटाला रामिन रझाईयानने इराणसाठी बरोबरी साधली. पहिल्या सत्रापर्यंत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये इराणने आक्रमक पवित्रा घेतला आणि शेवटच्या मिनिटांमध्ये एक गोलही केला, पण वेळेच्या पुनरावलोकनानंतर तो गोल फाऊल ठरवण्यात आला.



























































