
आपल्या भगव्यावर ‘श्रद्धा’ ठेवा आणि येणारा उद्याचा दिवस आपला असणार आहे त्यासाठी ‘सबुरी‘ ठेवा! पवित्र साईनगरी शिर्डी येथे पार पडलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या कुटुंबसोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निष्ठावंत शिवसैनिकांना संबोधित करत, विचारांचे बळ दिले. साईबाबांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आहे. आपण फक्त एकजुटीने लढूया, हा निर्धारसुद्धा व्यक्त केला. या कार्यकर्ता मेळाव्यास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
































































