
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांची आरती देखील केली. तसेच महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, जनतेच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.
































































