रुग्णाचा डॉक्टरांनी थेट अंगठाच कापून टाकला, शिवसेनेची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव (पू) येथील सोनावाला क्रॉस रोडवर राहणारे विनय तिवारी हे विनय इंडस्ट्रीमध्ये काम करतात. कारखान्यात काम करताना अंगठ्याला दुखापत झाली. त्यावरील उपचारासाठी तिवारी हे  सायन रुग्णालयात उपचारांसाठी गेले; पण उपचाराच्या नावाखाली त्यांचा अंगठाच कापून टाकला. याची सखोल चौकशी करून डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली.

औचित्याच्या मुद्दयाद्वारे सुनील प्रभू यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विनय तिवारी यांचा हात मशीनखाली दबला गेल्याने ते जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेले तेथून पुढील उपचारांसाठी त्यांना सायन रुग्णालयात पाठवले. पण रुग्णालयातील डॉक्टरने तिवारी यांचा सुस्थितीत असलेला अंगठा भूल देऊन कापून टाकला. त्यामुळे त्यांच्या शरीराचा एक अवयव कमी झाला आहे. या प्रकाराबद्दल रुग्णालयातील डॉक्टराच्या निष्काळजीपणाची सरकारने सखोल चौकशी करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि तिवारी यांनी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.