
अमेरिकेच्या ‘नासा’मधील हिंदुस्थानी अंतराळ प्रवासी अनिल मेनन हे 14 जुलैला कझाकस्तानच्या बॅकानूर का@स्मोड्रोम येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनला जाणार आहेत. ते आठ महिने मिशनवर राहून अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोग करतील. रशियाची अंतराळ एजन्सी रोस्कोस्मोसचे ‘सोयूज एएस-29’ अंतराळ यानाने अंतराळसाठी प्रवास करतील. या मिशनमध्ये त्यांच्यासोबत रशियाचे अंतराळ प्रवासी अन्ना किकिना आणि प्योत्र दुब्रोव हेही असतील. अनिल मेनन हे अमेरिकी अंतराळ दलात कर्नल म्हणून कार्यरत आहेत.

























































