
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सोशल मीडिया अकाउंट मर्यादित करण्यात आले आहे. या संदर्भात केजरीवाल यांनी (X) वर एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मेटा आणि मेटा इंडिया यांना टॅग करत कंपनीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
Hi @Meta @metaindia
Why have you restricted my account? Verbal enquiries at your India office revealed that my account has been restricted in India and is unavailable in India. Why? Noone in your office is giving any reasons. Noone is suggesting how restrictions can be removed.… pic.twitter.com/4JThAqFMon
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 6, 2026
केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तुम्ही माझे खाते का मर्यादित केले आहे? मेटाच्या हिंदुस्थानातील कार्यालयासोबत झालेल्या चौकशीतून माझे अकाउंट हिंदुस्थानात रिस्ट्रिक्टेड असल्याचे समोर आले आहे. पण असे का? असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. तसेच मेटाच्या कार्यालयातील कोणीही हे अकाउंट मर्यादित करण्यामागचे कारण किंवा ते कसे पूर्ववत होईल, याबाबत माहिती दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कंपनीला पाठवलेल्या ईमेलवर केवळ औपचारिक उत्तरे मिळाली असून ही अत्यंत वाईट सेवा असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या दबावाखाली येऊन कंपनीने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इतके झुकू नका. नाहीतर, ते तुम्हाला फक्त त्यांचेच सोशल मीडिया अकाउंट चालवण्याची परवानगी देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.



























































