गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला बॉम्बची धमकी; परिसरात तणावाचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराला बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर गुजरातमध्ये सुरक्षेचा इशारा जारी करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथके (BDTS) आणि श्वान पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी 9 वाजता गुप्तचर यंत्रणांना बॉम्बच्या धमकीचा मेल प्राप्त झाला. यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मंदिर व आसपासच्या परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र तपासणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. हा ईमेल कुठून आला याबद्दल तपास सुरू आहे. पुढील कारवाई सुरू आहे.