
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री चार तासांचा रात्रकालीन जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान मध्यरात्री 00.30 ते पहाटे 04.30 दरम्यान हा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत विरार/वसई रोड आणि बोरिवली/गोरेगाव दरम्यान सर्व अप धीम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्याचप्रमाणे, विरारच्या दिशेने जाणाऱ्या सर्व डाउन धीम्या मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि वसई रोड/विरार दरम्यान डाउन जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. रविवारी 16 ऑगस्ट रोजी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.




























































