
अभिनेत्री रसिका सुनील ही भलेही मालिकांमधून सध्या दिसत नसली तरी तिच्या एकाच भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. रसिकाने साकारलेली माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया ही कॉमेडीसोबतच थोडी निगेटिव्ह भूमिका असून देखील प्रेक्षकांच्या मनावर तिने राज्य केलं. रसिकाने नुकतेच साडीत एक बोल्ड फोटोशूट केले आहे.































































