
सध्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींचा स्क्रीन टाइम हा गंभीर विषय बनत चालला आहे. स्मार्टफोनचा अतिवापर हा आरोग्याला घातक आहे, हे माहिती असूनही अनेक जण बराच वेळ मोबाईल सोडत नाहीत. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी स्वतःच्या मोबाईल स्क्रीन टाइमबद्दल खुलासा केला आहे. मला स्वतःचा स्क्रीन टाइम पाहून धक्का बसल्याचे टिम कुक यांनी एका मुलाखतीत सांगितले.
टिम कूक म्हणाले, मला दर आठवडय़ाला स्क्रीन टाइमचा अहवाल मिळतो आणि तो माझ्यासाठी धक्कादायक होता. नकळतपणे माझा वापर वाढला होता. त्यानंतर मी अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद केले आणि प्रत्येक वेळी फोन हातात घेण्याची सवय कमी केली. आम्ही तंत्रज्ञान आणि फोन माणसाचे आयुष्य सोपे आणि समृद्ध करण्यासाठी बनवले आहे, सतत फोनमध्ये गुंतून राहण्यासाठी नाही, असे ते म्हणाले.






























































