
आयपीएल गाजवल्यानंतर आता हिंदुस्थानचा वंडरबॉय वैभव सूर्यवंशी दुलीप ट्रॉफीसाठी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. पूर्व विभागाने वैभवला फक्त आपल्या संघातच स्थान दिले नाही तर त्याची उपकर्णधार पदी नियुक्ती केली आहे. आता तो लाल चेंडूच्या क्रिकेटमध्येही आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल. टी-20 क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर वैभवला क्रिकेटच्या सर्वात आव्हानात्मक प्रकारात पदार्पण करायला मिळणार आहे.
वैभवच्या प्रभावी कामगिरीची दखल घेऊन त्याचा पूर्व विभागाच्या संघात समावेश करण्यात आला. त्याची उपकर्णधार पदी नियुक्ती झाली आणि त्याची जोरदार चर्चा झाली. बऱयाच जणांनी या निर्णयावर टीकाही केली. त्यामुळे वैभव या स्पर्धेत कशी फलंदाजी करतो आणि उपकर्णधार या पदाला कसा न्याय देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
वैभवने आयपीएल 2026मध्ये आपली छाप सोडली. त्यानंतर त्याची हिंदुस्थानच्या संघात निवड झाली. सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही, पण त्याने इंग्लंड दौऱयावर पदार्पण केले. मात्र तो या दौऱयात तो फारसा यशस्वी ठरला नाही. इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने झिम्बाब्वेमध्ये आपली छाप सोडली. त्याने तीन डावांमध्ये दोन अर्धशतकांसह 151 धावा केल्या. त्याची सरासरी 50.33 आणि स्ट्राइक रेट 196.10 होता. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
वैभव सूर्यवंशीचा खास संदेश
झिम्बाब्वे दौऱयावरून परतल्यानंतर त्याने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. त्याने आपल्या अधिपृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने बचावात्मक आणि आक्रमक अशा दोन्ही प्रकारच्या फटक्यांवर लक्ष पेंद्रित केले आहे. त्याने व्हिडीओला फक्त एका शब्दाचे कॅप्शन दिले आहे. यामध्ये त्याने फक्त ‘तयारी’ असेच लिहिले आहे.
पूर्व विभागाच्या निवड समितीने यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशनला दुलीप ट्रॉफीसाठी कर्णधार म्हणून निवडले आहे. वैभव सूर्यवंशीची उपकर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे त्याच्या कारकिर्दीतील एक मोठे पाऊल आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला आता लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपले काैशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तो बंगालचा अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरनसोबत डावाची सुरुवात करू शकतो. दुलीप ट्रॉफी 23 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना पूर्व विभाग आणि ईशान्य विभाग यांच्यात होईल.
पूर्व विभागाचा संघ पुढीलप्रमाणे…
इशान किशन (कर्णधार), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार), अभिमन्यू इशवरन, सुदीप घारामी, मोहम्मद शमी, मुकेश पुमार, शाहबाज अहमद, सूरज जयस्वाल, विराट सिंग, कुमार कुशाग्रा, शिखर मोहन, सुभ्रांशू सेनापती, अभिजित सरकार, अनुपूल रॉय, दानिश दास.





























































