
कर्जत तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच वदपमध्ये एका पोलिसाच्या घरावरच दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरटा घरात घुसला आणि कपाटातील ३ लाख ६८ हजारांचे दागिने घेऊन पसार झाला. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जतच्या वदप येथे राहणारे परशुराम मराडे हे नवी मुंबई एसीपी कार्यालयात कार्यरत आहेत. अधूनमधून ते वदप येथील आपल्या गावी येत असतात. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मराडे हे भावाच्या घरी गेले होते. घरातून बाहेर पडताना घराची चावी आतच विसरल्याने त्यांनी दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि निघून गेले. घरात कोणीही नसल्याचे समजताच चोरटा घरात घुसला. बेडरूममधील कपाटाची चावी शोधून कपाट उघडले. त्यानंतर लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरले.






























































