
कोण होणार करोडपतीच्या आतापर्यंतच्या सर्व सीझनचे अभिनेते सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. मात्र यंदा सूत्रसंचालनाची धूरा एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे. यंदाच्या सिझनचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री, बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दिक्षित करणार आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. सूत्रसंचालक म्हणून सादर करणारा पहिला अधिकृत प्रोमो 10 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाखालील ‘कौन बनेगा करोडपती’च्या 18व्या सीझनच्या प्रीमियरदरम्यान प्रदर्शित झाला. त्या प्रोमोत हिरव्या रंगाची पैठणी नेसलेली माधुरी दिसत आहे.





























































