Photo – आदित्य ठाकरे यांची पेगलवाडीच्या शाळेला भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रस्त्याची दुर्दशा समोर आणणारा इयत्ता चौथीतील विद्यार्थी आदित्य गोहिरे व स्मिता शिद यांचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला आहे. हातातील प्लॅस्टिकच्या बाटलीचा माईक करून त्यांनी खड्डे, चिखलातून वाट तुडवत शाळा गाठावी लागत असल्याची आपली व्यथा मांडून यंत्रणेला सवाल केले, याची गंभीर दखल घेवून गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पेगलवाडीच्या मारूती मंदिरात भरणार्‍या शाळेला भेट दिली. मोठ्या हिंमतीने समस्या मांडणार्‍या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संवाद साधला. त्यानंतर स्वत: या विद्यार्थ्यांवर छत्री धरून त्यांच्यासोबत भरपावसात चिखल तुडवत अर्धा किलोमीटर पायी चालत रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणीही केली.