
एकीकडे मद्याचे प्याले रिचवत गटारी साजरी होत असतानाच निसर्गरम्य येऊरमध्ये मात्र पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन बुधवारी ‘ग्रीन गटारी’ साजरी केली. येऊरच्या जंगलात पर्यटकांनी बेफिकीरपणे फेकलेल्या दारूच्या बाटल्या, पत्र्याचे डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे कप, थर्माकोलच्या प्लेट्स असा तब्बल २० गोण्या कचरा गोळा केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रशासन, ठाणे महापालिका व जिज्ञासा ट्रस्ट आणि सरस्वती सेकंडरी स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली. येऊरमधील हिरवाई जपण्याचा निर्धारही करण्यात आला. या मोहिमेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






























































