डॉ. डी. वाय. पाटील यांना नवी मुंबई पालिकेची आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत आदरांजली वाहण्यात आली. सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी डी. वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत प्रस्ताव मांडला. या प्रस्तावर चर्चा करताना महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे, माजी महापौर जयवंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, मनोज हळदणकर यांनी डी. वाय. पाटील यांना श्रध्दांजली वाहिली. डी. वाय. पाटील यांच्या संकल्पनेतून नेरुळमध्ये मोठे विद्यासंकुल उभा राहिले आहे.

या विद्यासंकुलाबाबत अनेक नगरसेवकांनी आठवणींना उजाळा दिला. डी. वाय. पाटील यांचे नवी मुंबईच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. नवी मुंबई शहरावर डी. वाय. पाटील यांचे विशेष प्रेम होते, असेही गौरवोद्‌गार नगरसेवकांनी काढले.