लेह-लडाखमध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का, नागरिकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

लेह परिसरात गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, 13 ऑगस्टला सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. पहाटेची वेळ असल्याने अनेक नागरिक झोपेतून जागे झाले.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. भूकंपाची तीव्रता वाढत गेल्यास त्याचा परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्यक्ष नुकसान किती होईल हे भूकंपाची खोली, केंद्रबिंदू आणि स्थानिक बांधकामांची स्थिती यावरही अवलंबून असते.