
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी येथील टीएचडीसी जलविद्युत प्रकल्पात निर्माणाधीन बोगदा कोसळला. दुर्घटनेत अनेक कामगार बोगद्यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत 10 जणांती सुखरुप सुटका करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अपघात झाला तेव्हा बोगद्यात कामगार काम करत होते. यादरम्यान बोगद्याचा एक भाग अचानक कोसळला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित वाचलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




























































