पावसानंतर घरात येणारा कुबट वास दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यामध्ये वातावरणात एकप्रकारे ओलावा निर्माण झाल्याने, घरामध्येही त्यामुळे कुबट वास येण्यास सुरुवात होते. पावसाळ्यात घरात येणाऱ्या कुबट वासामुळे अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी यावर वेळीच उपाययोजना करणेही गरजेचे आहे. पाऊस पाण्यामुळे घरामध्ये ओलावा आणि कुबट वासाची समस्या निर्माण होते. भिंती, फर्निचर, कार्पेट तसेच इतर वस्तूंमध्ये ओलावा साचल्याने बुरशी वाढीस लागते.

पावसामध्ये बाहेरून आल्यावर भिजलेले कपडे, शूज आणि छत्र्या घरातच ठेवण्यामुळे ओलावा वाढतो. म्हणूनच पावसात भिजलेले कपडे चांगले कोरडे करूनच मग ते वाळवावेत. म्हणूनच या वस्तू हवेशीर ठिकाणी वाळण्यासाठी ठेवायला हव्यात. कार्पेट किंवा सोफ्यावर बेकिंग सोडा काही वेळ शिंपडून नंतर व्हॅक्यूम केल्याने दुर्गंधी कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच पांढऱ्या व्हिनेगरचा वापर काही ठिकाणी कुबट वास कमी करण्यासाठी केला जातो. मात्र बुरशी किंवा पाण्याची गळती असल्यास केवळ वास घालवण्याऐवजी मूळ समस्या दूर करणे आवश्यक आहे.

पावसाळा थांबल्यानंतर घरातल्या खिडक्या आणि दरवाजे उघडून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच ओल्या भिंती, फरशी आणि घरातील इतर पृष्ठभाग त्वरित पुसून कोरडे करायला हवेत. भिंतीतून पाणी गळत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्या ठिकाणी हवा कमी खेळती आहे, हवेतील अतिरिक्त आर्द्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.