रशियात माउंट मिझिरगी शिखरावर हिमस्खलन; 11 गिर्यारोहकांचा मृत्यू, 6 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियातील उत्तर काकेशस भागातील कबार्डिनो-बाल्कारिया प्रदेशातील माउंट मिझिरगी शिखरावर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून 6 जण बेपत्ता आहेत. स्थानिक वेळेनुसार रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. याचा 33 गिर्यारोहकांच्या गटाला फटका बसला.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 10 गिर्यारोहक स्वतःहून खाली उतरले होते, तर अन्य सहा जण बेपत्ता आहेत, असे आपत्कालीन सेवा विभागाने सांगितले. बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू केले. दुर्गम भूप्रदेश आणि पुन्हा हिमस्खलन होण्याचा मोठा धोका यामुळे या कार्यात अडथळे येत होते, असे त्यांनी सांगितले.