
गली गली में शोर है, चौकीदार चोर है… मंदिरातले पैसे चोरतो कोण, चिले-चपाटे भामटे दोन… बीजेपी हटाव, देश बचाव. रामभक्त आणि शिवसैनिकांच्या या घोषणांनी रविवारी डोंबिवली दणाणून गेली. अयोध्या राम मंदिरातील कथित गैरव्यवहारा विरोधात डोंबिवलीतील शिवसैनिकांनी रविवारी सायंकाळी भरपावसात ‘रामरक्षा’ आंदोलन केले. मुसळधार पाऊस असतानाही ‘रामरक्षा आरती’ आणि महाआरतीने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उत्तरला आहे. कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात आले होते. विशेष म्हणजे, जोरदार पाऊस सुरू असतानाही शिवसैनिकांनी
मोठ्या संख्येने उपस्थिती
डोंबिवलीच्या इंदिरा चौकात महाआरती लावली. भरपावसात शिवसैनिकांनी महाआरती करत केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या आंदोलनात संपर्कप्रमुख तथा उपनेते गुरुनाथ खोत, सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, संपर्क संघटक मृणाल यज्ञेश्वरी, जिल्हाप्रमुख अभिजित सावंत, शरद पाटील, जिल्हा संघटक कल्पना कवडे, अंजली राऊत, रवींद्र सुर्वे, जिल्हा समन्वयक सुधीर पाटील, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, विलास म्हात्रे, नारायण पाटील, राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, शहरप्रमुख हेमंत चौधरी, प्रशांत धोंडे, संदीप पगारे, कुणाल ढापरे, सुरेश परदेशी, सचिन पाटील, लहू चाळके, शहर संघटक अक्षरा पटेल, प्रियांका विचारे, ज्योती पाटील, मीना माळवे, संपर्कप्रमुख तुषार शिंदे, ग्रामीणचे उपतालुकाप्रमुख परेश पाटील, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



























































