असं झालं तर… ईपीएफओ पासबुक चेक करायचंय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरमहिन्याला कंपनीकडूनही काहीशी रक्कम कर्मचाऱयाच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येते. रक्कम दरमहा जमा होते का याची खात्री करून घ्या. EPFO पासबुक चेक करता येते.

ईपीएफओच्या ऑनलाईन पासबुक पोर्टलवर जा. UAN क्र. आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. कॅप्चा कोड भरा. ‘PassBook’ वर क्लिक करा. मेंबर आयडीची निवड करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. काही सेकंदांत एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्सची माहिती मिळेल.

मोबाईलवरून EPFOHO UAN हा मेसेज 7738299899 या क्र.वर पाठवा. उमंग ऍप डाऊनलोड करा, EPFO सर्च करा ‘View PassBook’ वर पासबुक पाहू शकता.

तुमचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे तसेच तो ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत असावा. खात्याची KYC पूर्ण असावी.