
कठीण कामे पुढे ढकलण्याऐवजी ती लवकर पूर्ण करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो. त्या कामाचे लहान, व्यवस्थापित करता येतील असे भाग करा. स्वतःला सांगा की, मी हे काम फक्त 5 मिनिटे करणार आहे.
नकारात्मक बोलणाऱया लोकांपासून थोडे अंतर ठेवा. सकारात्मक विचारांच्या लोकांना जवळ करा.
मनाला शांत ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि मन मोकळे ठेवा. खोल श्वासोच्छ्वास (डिप ब्रीदिंग) करणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.




























































