
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट 2026 ला आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 1 हजार 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 4 हजार 875 लोक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतरही लष्कर आणि सुरक्षा दलाकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. तसेच बचावकार्य केले जात आहे. पुरामुळे नेपाळमध्ये ठिकठिकाणी चिखल साचल्याने मदतकार्य करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. जे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

























































