
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने कौंटी चॅम्पियनशिपमध्ये सरे संघाकडून पदार्पण करत आपली चमक दाखवली. हा सामना केनिंग्टन ओव्हलवर यॉर्कशायरविरुद्ध खेळला जात आहे. नबीने सामन्यात एकूण 20 षटके टाकली आणि दोन विकेट घेतले. त्याने पहिल्या डावात 15 षटके गोलंदाजी केली आणि 33 धावांत एक विकेट घेतली, ज्यामध्ये तीन निर्धाव षटकांचा समावेश होता. नबीने हिंदुस्थानचा खेळाडू कुलदीप यादवला आपला पहिला बळी बनवले. कुलदीपचा चेंडू नबीच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जात असताना त्याच्या बॅटची बाहेरील कड लागली आणि दुसऱया स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ऑली पोपने सोपा झेल घेतला. कुलदीपने तीन चौकारांच्या मदतीने 53 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या.

























































