
तामीळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय हे आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. विजय यांच्या परदेश दौऱ्याला केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली असून विजय हे 11 सप्टेंबरपासून चार दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.
मुख्यमंत्री विजय हे ब्रिटन दौऱ्यात काही गुंतवणूकदारांना भेटणार आहेत. गुंतवणूकदारांसोबत 1.02 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसोबत एक शिष्टमंडळही युकेला जाणार आहे. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असल्याने ब्रिटन दौऱ्याची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आली नाही.
8 सप्टेंबर रोजी अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत गाईडन्स तामीळनाडू उद्योग, वाणिज्य विभागाचे अधिकारी-सचिव असतील. केवळ चार महिन्यांत वेट्री तामीळनाडू इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये 97 पंपन्यांनी 67,452 कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली.

























































