विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांत जनगणना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रत्यक्ष जनगणनेला 1 डिसेंबर 2026पासून सुरुवात होणार आहे. गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील बर्फाळ प्रदेश वगळता इतर भागात सर्वप्रथम जनगणना सुरू होणार असून 4 जानेवारी 2027पर्यंत हे काम सुरू राहील. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’तर्फे आज ही माहिती देण्यात आली. या राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यातील नागरिक 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात स्वतः आपली माहिती नोंदवू शकतील. देशातील इतर भागात जनगणना 1 मार्च 2027पासून सुरू होईल.