
ज्या पद्धतीने भाजपवाले पक्ष फोडतात, त्याप्रमाणे तुम्ही विद्यार्थी फोडा आणि शाळेची पटसंख्या वाढवा, असा फुटीर सल्ला शिंदे गटातले मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळय़ात मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा दाखला दिला. शिक्षकांनीदेखील आता भाजपप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी फोडले पाहिजेत, असे ते म्हणाले.
मराठी शाळेत पटसंख्या टिकवणे मोठे चॅलेंज
मराठी शाळांमधील पटसंख्या टिकवणे हे एक फार मोठे चॅलेंज बनले आहे आणि त्यामध्ये कुटुंब नियोजनाची व्याख्या हादेखील मोठा विषय आहे. आता हम दो हमारे दो और इंग्लिश मे जाने दो हा मोठा कार्यक्रम बनला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.























































