
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱया वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयंक हरिशंकर पंड्या असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा उदयपूर, राजस्थानचा आहे. परीक्षेच्या एक दिवसाआधी मयंकने आत्महत्या केली. शहरातील गांधीनगर कॉलनीत एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर तो भाडय़ाच्या खोलीत एकटा राहत होता. मयंक पंख्याला बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला.
































































