
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे मुंबईत दहीहंडी उत्सवाच्या आनंदात सहभागी झाले. आज महाराष्ट्रभर दहीहंडीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय! ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात उंचच उंच मानवी मनोरे रचत, एकजुटीची ताकद दाखवणाऱ्या गोविंदांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. मी देखील आज ह्या उत्सवाच्या आनंदात सहभागी झालोय! असे आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे, शिवसेना सचिव व स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि शिवसेना आमदार महेश सावंतही यावेळी सोबत होते.
































































