
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार जाऊन आता त्या ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. सत्तेत आल्यानंतर मतदारांना वेगवेगळी आश्वासने देणाऱया भाजपला आता आश्वासनांचा विसर पडला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डासांना घालवण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलले म्हणून मी डासांना कमी चावा असे सांगू शकत नाही, असे अजब विधान पश्चिम बंगालच्या मंत्री आणि भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये डेंग्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही आठवडय़ात डेंग्यूमुळे चार हजारांहून अधिक जणांना बाधा झाली आहे. डेंग्यूमुळे सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अग्निमित्रा पॉल यांच्या या अजब विधानानंतर माजी खासदार जवाहर सिरकार यांनी टीका केली. बंगालमध्ये भाजपचा सफाया फक्त त्याच करू शकतात. याआधी त्यांनी फुटपाथवर मुलासाठी दूध गरम करणाऱया बेघर महिलेला विचारले होते की, तुझ्याकडे घर नाही का?, अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.




























































