
देशातील 48 शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. लातूर जिह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी, बीड जिह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हाती लेखणी देणाऱया कविता गित्ते आणि नाशिकमधील महापालिका शाळेतील कुंदा बच्छाव यांना राष्ट्रपतींनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

























































