परीक्षण – पोलीस आयुक्तांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

मुंबईता गुन्हेगारी विश्वाची खडान्खडा ताजी खबर असणारे, जीव धोक्यात घून दंगी-बाम्बस्फोटांचे आान द स्पॉट रिपोर्टिंग करणारे ‘सामना’चे ज्येष्ठ पत्रकार, क्राईम बीटचे वार्ताहर प्रभाकर पवार यांचा धाडसी स्वभावच वेळोवेळी त्यांच्या कामी आला. ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांचे गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकणारे ‘पोलीस डायरी’ हे दर गुरुवारी प्रसिद्ध होणारे साप्ताहिक सदरही गाजले. आजही या लोकप्रिय सदरामुळे कोणतीही नुकतीच घडलेली गुन्हेगारी घटना आणि तिच्या सर्व बाजू ठळकपणे उजेडात येतात. हा माणूस हाडाचा क्राईम रिपोर्टर असून आपल्या कामाशी तो अतिशय प्रामाणिक आहे याची खात्री पटल्यानंतर मात्र तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून पवार यांना महत्त्वाच्या आवश्यक बातम्या पुरवल्या जात होत्या.

या माहितीचा काहीही दुरुपयोग होणार नाही याची खात्री असल्यामुळेच इतरांना न मिळणाऱ्या बातम्या पवार यांना सर्वप्रथम सहज मिळू लागल्या. 1992-93 च्या दंगलीचे त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केलेले वार्तांकनही गाजले. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यासाठी गुन्हेगारी विश्वातील घडामोडी आणि बातम्यांचा खजिनाच खुला झाला. त्याच आधारे आजपर्यंत मुंबई अंडरवर्ल्डवर लिहिलेली त्यांची 10 पुस्तके प्रकाशित झाली आणि आता ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ हे 11 वे पुस्तक आलीकडेच प्रकाशित झाले आहे.

मुंबईतील जातीय दंगली, साखळी बाम्बस्फोट आणि प्रामुख्याने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या चिथावणीखोर घटनांमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांचे नेतृत्व, समन्वय आणि धैर्य यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य झाले होते. त्यावेळी प्रत्यक्ष फिल्डवर परिस्थितीचे आकलन करून घेत असताना प्रभाकर पवार यांची पहीली भेट मुंबईचे 23 वे पोलीस आयुक्त अमरजितसिंग सामरा यांच्याशी झाली. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे पीस खात्याविषयी त्यांना वाटणारी भीती नाहीशी होऊन मुंबई पोलीस दलाच्या अगदी निकटच्या सहवासात अभ्यास करण्याची संधी त्यांना लाभली. या प्रवासात आर. डी. त्यागी, आर. एच. मेन्डोन्सा, एम. एन सिंग, रणजीत शर्मा, डी. एन. जाधव, डी. शिवानंदन, डा. सत्यपाल सिंह, राकेश मारिया, दत्तात्रय पडसागीकर, देवेन भारती यांसारख्या अनेक पोलीस आयुक्तांनी मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कशी महत्त्वाची कामगिरी बजावली हे पवार यांना जवळून पाहता आाहे. त्यातूनच त्यांचे ‘मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास’ हे नवे पुस्तक आकाराला आला आहे. अलीकडे गँगवार, अंडरवर्ल्ड संपले असले, बाम्बस्फोटही थांबले असले तरी दीड-दोन दशकांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. तत्कालीन पोलीस आयुक्तांना कोणत्या ना कोणत्या प्रसंगांना, संकटांना सामोरे जावे लागत होते. त्याचाच लेखोजोखा प्रभाकर पवार यांनी या पुस्तकात मांडाला आहे. त्यात त्यांना कोणत्याही अधिकाऱ्यांचा वृथा गौरव वा कोणावर द्वेषमाक टीका केलेली नाही. पोलीस आयुक्तांच्या इतिहासाची वस्तुनिष्ठ ओळख व्हावी याच हेतूने हे सत्य कथन केल्याचे जाणवते.

1992 पासून क्राईम रिपोर्टिंग करताना लेखक प्रभाकर पवार यांचा मुंबईच्या 25 पोलीस आयुक्तांशी संबंध आला. त्या तसेच त्याआधीच्या 22 अशा 47 पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या काळातील बऱ्यावाईट घटनांबरोबरच संघटित गुन्हेगारीवरही पवार यांनी प्रकाश टाका आहे. ब्रिटिश काळाता 19 पोलीस आयुक्तांपैकी काही अत्यंत कर्तबगार पोलीस आयुक्तांची कार्यशैली त्यांनी यथार्थपणे वाचकांसमोर मांडली आहे. मुंबईच्या सर्व पोलीस आयुक्तांची एकत्रित ओळख करून देणारे पुस्तक म्हणून या पुस्तकाचे महत्त्व अधिक आहे. पोलीस आयुक्तांच्या कामगिरीचा मापदंड म्हणूनही या पुस्तकाकडे पाहो जाऊ शकते. मुंबईच्या प्रत्येक पोलीसाने, आयपीएस अधिकाऱ्याने वाचावे व संग्रही ठेवावे असा मुंबईच्या गुन्हेगारीचा सखोल माहितीचा समावेश त्यात आहे. सत्य घटनांचा हा रोमांचकारी इतिहास असून पोलीस दलाच्या नेतृत्वाचा व योगदानाचा यथार्थ वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.

दुर्मिळ छायाचित्रांचा ऐतिहासिक ठेवा हे या पुस्तकाचे आणखी एक आकर्षण आहे. 1856 मधा मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीपासून आजच्या दक्षिण मुंबईता पोलीस आयुक्त कार्यालयीन इमारतीपर्यंत तसेच वेळोवेळी सुसज्ज असलेल्या अनेक भागांतील पोलीस मुख्यालयांचीही छायाचित्रे आहेत. गुन्ह्यांची उकल करणाऱ्या ‘जंजीर’सह मुंबई पोलिसांच्या श्वानपथकाचे छायाचित्र आहे. देशात अव्वल ठरलेले पोलीस बॅण्ड पथक तसेच पोलीस दलाच्या संचानाचीही छायाचित्रे आहेत. क्रूरकर्मा रामन राघव याची कोर्टाता हजेरी, ए.सी.पी. मधुकर झेंडे यांची सीरियल कीलर, चार्ल्स् शोभराजा अटक केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एसीपी झेंडेंसह, पोलीस महासंचाक सूर्यकांत जोग, पोलीस आयुक्त द. शं. सोमण यांच्या केलेल्या सत्काराचे छायाचित्रही कृतज्ञतेची जाण असणारे आहे. त्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून शिवसेनेच्या अनेक आंदानापर्यंत उसळलेल्या दंगीलीची बोलकी छायाचित्रेही आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायाचे छायाचित्र स्मृतींना उजाळा देणारे आहे. अशा कितीतरी तत्कलीन घटनाप्रसंगाची छायाचित्रे पुस्तका अधिक जिवंतपणा आणतात.

मुंबईकरांनी आजपर्यंत मुंबईत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना, जातीय दंगली, धर्मांध पाकिस्तानची सूडवृत्ती पाहीली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यानुसार कठोर उपाययोजना करण्याची शक्ती सगळ्यांकडेच नसते. तरीही स्वतःच्या बुद्धिमत्तेचा कस लावून जे रणात उतरले ते यशस्वी झाले. टोळीयुद्धाच्या समाप्तीपासून ते आजच्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांपर्यंत रोज घडणाऱ्या गुन्ह्यांना तोंड देणे हे आजच्या पोलीस आयुक्तांपुढील नवे आव्हान आहे. मात्र जुनी आव्हाने संपली तरी त्यातून मिळालेले धडे पोलीस खात्याला आजही मार्गदर्शक ठरतात. या पुस्तकात चित्रपटाता एकामागोमाग एक सरकत्या दृश्यांसारख्या मुंबईतील गुन्हेगारी विश्वाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून जातात. 12 मार्च 1993 मध्ये 13 साखळी बाम्बस्फोटांनी उडवा हाहाकार, वालजी पालजी गँगची दहशत, आगर बाजारातील गँगस्टर मन्या सुर्वेचे एन्काऊंटर, गिरणी कामगार संप, मुंबई पोलीसांचा संप, रमा नाईकचे एन्काऊंटर, शिवसेना आमदार रमेश मोरे, विठ्ठल चव्हाण, नगरसेवक के. टी. थापा, विनायक वाबळे यांच्या हत्या, भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा, रामदास नायक यांच्या हत्या, अंडरवर्ल्ड डान अमर नाईकसह 56 गुंडांचे पारिपत्य, कामगार नेते डॉ. दत्ता सामंत व कॅसेटकिंग गाशन कुमार यांच्या हत्या, नगरसेविका नीता नाईक, नगरसेवक कमलाकर जामसांडेकर, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या, समुद्रमार्गे आलेल्या पाकिस्तानी दहशतवादी कसाब व त्याच्या सहकाऱ्यांशी जिवाची बाजी लावून लढलेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांसारख्या 18 पोलीस अधिकाऱ्यांचे बालिदान या साऱ्या घटना म्हणजे मुंबईचा रक्तरंजित इतिहास आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी त्या-त्या वेळी त्या कसे तोंड दिले हा त्यांच्या समयसुचकतेचा भाग आहे. तरीही मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सतत कुणाच्या ना कुणाच्या दबावाखाली काम करावे लागते ही वस्तुस्थिती आहे. प्रभाकर पवार यांनी ती व्यवस्थित मांडली आहे. मंत्र्यांचे, राजकारणी नेत्यांचे वेळोवेळी होणारे हस्तक्षेप त्यांचे मनोधैर्य खच्ची करणारे असतात. कधी नको तिथे कारवाईची नाटके करून काही अधिकारी आफत ओढवून घेतात, तर काही वरिष्ठांनी घेतलेल्या संशयाच्या हेतूमुळे गुन्हा नसताना जेलची हवा खातात. मुंबई पोलीस आयुक्तांच्या कारकीर्दीचा इतिहास असा चित्रविचित्र घटनांनी भरलेला आहे. प्रभाकर पवार यांनी आपल्या परीने त्याचे योग्य विशेषण केले आहे. पवार यांच्या विवेचनातील स्पष्टवक्तेपणा, त्यांची साधी सोपी भाषाशैली, नेमका विषय मांडण्याची हातोटी आणि तटस्थपणे साऱ्या घटनांकडे पाहण्याची वृत्ती या जमेच्या बाजू आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हा विषय केंद्रस्थानी असा की आजूबाजूच्या परिघात घडणाऱ्या गोष्टी त्या इतिहासाचा एक भाग बनून जातात. हे पुस्तक त्याला अपवाद नाही. माजी पोलीस महासंचाक अजित पारसनीस यांची विवेचक प्रस्तावना, लेखकाचे मनोगत, ब्रिटिश काळाता व स्वातंत्र्योत्तर काळातील पोलिस आयुक्तांची कारकीर्दीच्या तपशीलासह यादी लेखनाला पुरक अशीच आहे. पुस्तकाची मांडणी व सजावट उत्तम आहे. मुखपृष्ठही आकर्षक आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास
लेखक ः प्रभाकर पवार
प्रकाशक ः प्रणिता पवार,
पप्पू-प्राची प्रकाशन, दहिसर, मुंबई.
पृष्ठे ः 180,
मूल्य ः 300 रुपये