
वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस सुरू असतानाच दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मैदानावर शाब्दिक चकमक रंगली. दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने वैभवला डिवचण्यासाठी ‘हा व्हाइस-कॅप्टन?’ असा टोमणा मारला आणि दोघे आमने सामने आले. वातावरण चांगलेच तापल्याने पंचांना हस्तक्षेप करून दोघांना दूर करावे लागले.
पूर्व विभागाच्या डावातील 11 व्या षटकात हा प्रकार घडला. तिलक सातत्याने वैभवशी बोलत होता. टोमणे वाढताच वैभवनेही प्रत्युत्तर दिले. दोघांमध्ये काही क्षण तीव्र शाब्दिक बाचाबाची झाली. तिलकने हातवारे करत आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचे दिसले. अखेर पंचांनी मध्ये पडत वाद शांत केला. हा प्रसंग घडण्यापूर्वी वैभवने मैदानावर आपला आक्रमक अंदाज दाखवला होता. त्याने अनुभवी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर एका षटकात दोन चौकार आणि एक षटकार ठोकला.
वैभवच्या वादळानंतर ईशानचा धमाका; ईशान-कुशाग्रची नाबाद 144 धावांची भागीदारी

























































