
आरोग्य विभागात आता अधिकाऱयांच्या कामाचे स्कॅनिंग होणार आहे. मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांचे रिपोर्ट कार्ड बनवले जाणार आहे. त्याआधारे प्रामाणिक अधिकाऱ्यांवरच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. पुढील तीन वर्षे काय करणार याचेही नियोजन नियुक्त्यांच्या वेळी केले जाणार आहे.
कामगिरीच्या आधारे अधिकाऱयांना संधी देण्याची नवी कार्यसंस्पृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱयांचे दरवर्षी गुणांकन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे केवळ सेवाज्येष्ठतेला नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला महत्त्व मिळणार आहे.
11 कसोट्या…100 गुणांचे मूल्यांकन
31 मार्च 2026 रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मागील तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एपूण 100 गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या मूल्यांकनात अधिकाऱयांना 11 कसोटय़ांवर स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. दरवर्षी असे गुणांकन केले जाणार आहे.
लोकाभिमुखता आणि तक्रार निवारण
नेतृत्वगुण, विशेष काwशल्य, प्रशिक्षण व संवादकाwशल्य जिल्हा वार्षिक नियोजनासह राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि सीएसआर निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापन
आरोग्य संस्थांमध्ये आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाही अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य पेंद्रे आणि उपपेंद्रांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरी


























































