वरळीत बेस्टचा अपघात, बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट बस अपघाताचे सत्र थांबतच नाही. वरळी येथे सोमवारी सकाळी झालेल्या बेस्टच्या बस अपघातात एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वनमाला साबळे असे मयत महिलेचे नाव आहे. वरळी एसटी ऑफिसजवळी सिग्नलवर सकाळी 11.25 वाजता हा अपघात झाला. अपघात प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मुंबई सेंट्रल डेपोच्या ‘वेट-लीज’ चालकाद्वारे चालवली जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बस भायखळा स्थानकातून लोटसकडे जात होती. तर वनमाला साबळे या बसच्या शेजारील टॅक्सीतून प्रवास करत होत्या. सिग्नल लाल असल्याने वनमाला या टॅक्सीतून उतरत होत्या. इतक्यात हिरवा सिग्नल लागला आणि बस सुरू झाली.

बसचालकाने बस पुढे सरकवल्याने वनमाला या बसच्या मागच्या चाकाखाली आल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बस कंडक्टरने जखमी महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारापूर्वी, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.