
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड एक्सप्रेसची नियमित सेवा मंगळवार, 8 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्सप्रेस 8 सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 9 सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येईल.
गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्सप्रेस दररोज 23.55 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे पावसाळी वेळापत्रकानुसार 13.50 वाजता पोहोचेल. तसेच 21 ऑक्टोबरपासून ही गाडी दुसऱ्या दिवशी 14.15 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 9 सप्टेंबरपासून दररोज सावंतवाडी रोड येथून पावसाळी वेळापत्रकानुसार 17.00 वाजता आणि 21 सप्टेंबरपासून 17.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 6.40 वाजता पोहोचेल.
या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.



























































