Women’s T20 Asia Cup – शेफाली वर्माला नडायला गेली अन् तोंडावर पडली! पाकिस्तानच्या कर्णधारावर ICC ने केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Women’s T20 Asia Cup मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला पुन्हा एकदा धोबी पछाड करत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. हिंदुस्थानने दिलेल्या या झटक्यातून पाकिस्तान सावरणार तोच ICC ने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिम समावर ICC ने कारवाई केली आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामन्यात शफाली वर्माला बाद केल्यानंतर कर्णधार फातिमाने आनंद व्यक्त करण्याच्या नादात ICC च्या नियमांच उल्लंघन केलं. तिने शफालीला तंबुच्या दिशेने जाण्याचा रस्ता दाखवला. हे कृत्य ICC आचार संहिता नियम 2.5 चे उल्लघन असून याप्रकरणी फातिमाला दोषी ठरवण्यात आलं आहे. ICC च्या या नियमानुसार एखाध्या फलंदाजाला बाद केल्यानंतर फलंदाजाचा अपमान होईल अशी भाषा वापरण, हावभाव करणं किंवा कृती करण्याशी संबंधित आहे. पंचांनी तक्रार केल्यानंतर ICC च्या सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांनी फातिमाला त्या कृत्यासाठी दोषी ठरवलं आहे. फातिमाने सुद्धा आपली चूक मान्य केली आहे.

ICC च्या या कारवाईसह फातिमा सनाच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील 24 महिन्यातील हा दुसरा डिमेरीट पॉईंट आहे. यापूर्वी 3 ऑगस्ट 2025 रोजी आयर्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यामध्ये फातिमाला एक डिमेरिट पॉईंट मिळाला होता. या कारवाईमुळे भविष्यात तिच्यावर सामना बंदीची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते.