मणिपूर गिटारवादकाचा दिल्लीत मारहाणीत मृत्यू; 7 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील दक्षिण-पूर्व भागात 54 वर्षीय मणिपुरी संगीतकार सी. विक्रम सिंग यांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. गल्लीमध्ये होणाऱ्या जोरदार आवाजावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दक्षिण-पूर्व दिल्लीचे पोलीस उपआयुक्त (DCP) विनीत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम सिंग यांच्या गल्लीत खूप मोठा आवाज येत असल्याने त्यांनी तेथील काही लोकांशी याबद्दल जाब विचारला. यावरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हल्ल्यात विक्रम सिंग हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवून या प्रकरणाशी संबंधित सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिल्लीमध्ये मणिपुरी गिटारवादकाची बेदम मारहाणीत मृत्यू, आठ जणांवर आरोप